Saturday, January 12

तू भिजूही नको एवढी साजणी !!!



"पावसा रे किती आसवे मागतो

मी किती द्यायचे का असे वागतो .....?


मेघ पेंगायला लागले सावना

चंद्र मेघांतला का तरी जागतो ??


काळजाची व्यथा बोललो ना कुणा

थेंब होऊन ये मी तुला सांगतो !!!


पावसाच्या सरी कोसळू लागता

मी कशाला तुझ्या भोवती रांगतो ?


तू भिजूही नको एवढी साजणी

तोल माझा गडे बघ ढळू लागतो !!!"

Published in 'Yuwa SAKAL'. kashi watli te jarur sanga ...
Abhiiiii 9850531124

1 comment:

सुजित बालवडकर said...

धन्यवाद अभिजित मला ही कविता खुप आवडली. माझाही मराठी कवितांचा ब्लॉग आहे. http://marathikavitaa.blogspot.com/
नक्की भेट दे........आणि सांग कसा वाटला