Monday, April 27

जादुगर असेन ती ...!!
********************************
वाटते कधीकधी जादुगर असेन ती ...
गर्द ह्या नभातली सांजसर असेन ती !!!
मी कयास काढला ..... मी मनास बोललो
डौलदार देखणी अंगभर असेन ती !!!
ती दिसेन चांदवा सांद्र मौसमातला
एकमेव येथला संगमर असेन ती !!!
ती म्रूदू विणा जणू ती मधाळ मारवा
रेशमी गळ्यातला आर्तस्वर असेन ती !!!
ती प्रसन्न राहते एवढी कशी अभी?
काळजातले जुने देवघर असेन ती !!!
********* Published in 'KUSUMAKAR' *********