Monday, April 27

जादुगर असेन ती ...!!
********************************
वाटते कधीकधी जादुगर असेन ती ...
गर्द ह्या नभातली सांजसर असेन ती !!!
मी कयास काढला ..... मी मनास बोललो
डौलदार देखणी अंगभर असेन ती !!!
ती दिसेन चांदवा सांद्र मौसमातला
एकमेव येथला संगमर असेन ती !!!
ती म्रूदू विणा जणू ती मधाळ मारवा
रेशमी गळ्यातला आर्तस्वर असेन ती !!!
ती प्रसन्न राहते एवढी कशी अभी?
काळजातले जुने देवघर असेन ती !!!
********* Published in 'KUSUMAKAR' *********

Tuesday, August 26

"वेडीच आहेस तू"!! (kavita)


*********************************
"वेडीच आहेस
तुला कसं गं काहीच कळत नाही ....

येथे जाळणारे बरेच आहेत
पण कोणीच स्वतः जळत नाही !!!

ज्याचा घाव न् घाव,
ठेवला आहेस काळजात जपून

त्याचा मात्र तुझ्यासाठी
एकही अश्रू ढळत नाही ...


वेडीच आहेस
तुला कसं गं काहीच ठाऊक नाही ??

हे जगच पारध्यांचे
येथे कोणीच भाऊक नाही !!!!

समजून घ्यावी कोणी
तुझ्या काळजातली कळ ?

तुझ्या सारखी कोणाचीही
वेदना घाऊक नाही !!

वेडीच आहेस
कशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाही

अजूनही त्याच्या शिवाय
दुसरी 'हसरत' म्हणून नाही ...

एकांतात आसवांशी
सारखं हितगूज करतेस म्हणे !

लोकांसमोर मात्र
अश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !!


वेडीच आहेस
अजूनही स्वतःलाच दोष देते .

रेशीम वेळी मनाला
आठवांचा कोष देते !!

साळसूद पणे निघून जाणार्याची
अडचण असेन काही .....

असे समजून
घटके पुरता मनास तोष देते !!!

वेडीच आहेस
आता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ ...

आयुष्या वर ओढवून घेतलेले
विरहाचे ढग बघ !!!

तू ही सगळ्यांं सारखी
'Practical' होऊ शकतेस ...

एकदा तरी तुझ्यामधली
आजमावून रग बघ !!!

एकदा तरी तुझ्यामधली
आजमावून रग बघ !!!


Mitrano, mazya kavitechi Nayika ashi ahe.. Niragas, Jagachya riti bhati
na kalanari. Ya kavite waril tumachya comment jarur post kara.

Saturday, August 9

"याद "

"मुक्या मनातील शब्दांना आज जाग आली ...

निमित्य झाले काही अन् तुझी याद आली !!!"

हळूवार भास झाला अन् स्वप्नही तुझे पडले

का माझ्या काळजात तू राहायास आली ???"

Mitrano, 2005 chya Valentine Day nimmitya dainik Sakal ne aayojit kelelya charoli event madhe hi charoli prakashit zaliy. Abhi!

Tuesday, August 5

'स्वप्नातली परी'

'स्वप्नातली परी'
*****************

वेदना कोणती तरी होती ....
तू दिलेली दवा बरी होती !!

भेटली ना मने तुझी माझी
भोवती आडवी दरी होती !!

हासतो आजही जरी खोटा ....
कालची आसवे खरी होती !!

नाव घेतेस का कधी माझे ?
तू तशी फार लाजरी होती !!

सोडुनी का उदास माहेरा ?
हाय तू दूर सासरी होती !!

हात मागू नवा कशासाठी ?
जिन्दगानीच आखरी होती !!!

बोललो ना जरी कधी तेंव्हा
तूच 'स्वप्नातली परी' होती !!!


By- Abhijit Nagle.
Mitrano, please pratikriya kalawayala visaru naka.
Mazi hi Gazal tumhi 'Kusumakar' chya ankat dekhil vachu shakata.

Saturday, January 12

"तुझी आठवण": चारोळी

"खरच तुझ्या आठवनिंना

दुसरी कुठलीच तोड नाही ......

तुझ्या आठवण झऱ्यां इतकी

तर साखरही गोड नाही !!!"


नशीब with an abhijit effect!

यारानो, असा विश्वास वाटतो .... चारोळीच्या भाषेत ......

"हळूच चालत तुझ्या रूपाने
नशीब येईन दारी ...
मला न कळता अशी अचानक
घडेन किमया सारी "

"झळ" : चारोळी with an abhijit effect!!



"स्थळ लागत नाही... काळ लागत नाही


तुझी आठवण यायला वेळ लागत नाही


कित्ती स्वतःमध्ये तू गुंतून गेलीस बघ


मी जळतोय पण तुला झळ लागत नाही !!"


Aawdala na ha effect. Nasel tarihi sanga. Mi aankhi prayatna karen. Pratikshettumchach .... ABHYAA !
"आपण घालवलेला एकही क्षण

विसरायला सांगू नकोस ......

तुला विसरनारे असतिलही

त्यात मला मोजू नकोस !!!"
"मला विसरण्याची तुझी

सवय जुनी आहे .....

तुझ्या आठवणीत माझी

रात्र सुनी आहे !!!!"


Actually, hi charoli mhanje mi mazya maitrinila pathawlela ek SMS ahe... Parantu, baryach janana hya oli awadalyache tyani mala sangitale... Mhatale, aaplya orkut friends sobat dekhil hi share karavi ... Kashi vatate te nakki kalawa bar ka ...!!

एक विरह जपण्यासारखा !!!!

"या सौद्यातील नफा तोटा

नाहीच तसा लपण्यासारखा .....

तुझ्या प्रेमात मला मिळाला

एक विरह जपण्यासारखा !!!!"

*****

"या हंगामातही तुझ्या

आठवणींची पेरण.......

पुन्हा एकदा विषानेच

होऊ दे माझे मरण .... !!!"

*****

माझ्या प्रेमाचा थांग पाहण्याचा प्रयत्न करू नकोस !


"माझ्या प्रेमाचा थांग पाहण्याचा प्रयत्न करू नकोस

मेलो तरी तुझ्या हाकेला 'ओ' देत राहीन...

जर तुला प्रणयास पाऊस हवा असेन

मी श्रावणास माझे अश्रू उसने देईन !!!"

that's kind of flustration I have undergone.

"रूप" ... Gazal.


"पहिल्याच पावसाचे रूप वाटला तू

तनहाच साजणा रे खूप वाटला तू !!!


चुकला असेल ठोका काल काळजाचा

विरहात बोलला पण चूप वाटला तू !!!


सजणा कसा कळावा खेळ सावल्यांचा

मज सावलीत वेड्या धूप वाटला तू !!!


उरलेच काय बाकी काळजात माझ्या

मन बावरीस माझा नृप वाटला तू !!!


Published in Sakal's Nagpur Edition.

जराशी उशिरा मला मौत यावी !!

I have posted here one of my gazals.
This was published in Sakal Paper's Gazalnama section by Bhimraoji Panchale.

"असा जीवनाचा लळा लागला रे ...
झरा वेदनेचा सखा वाटला रे !!!

मुका वाटतो मी परी मुक नाही
व्यथा सांगणारा गळा दाटला रे !!!

तिला साजणाची कधी याद यावी ??
तिचा एकटिचा असे मामला रे !!!

कधी सावली का तुझ्या दूर गेली ??
पळुनी असा तू कुठे चालला रे !!!

किती मी तुझी चाकरी रोज केली
प्रभू तू तरिही कुठे पावला रे !!!

जिच्या मी रुपेरी रूपाचा दिवाणा
तिनेही लटांनी गळा कापला रे !!!

जराशी उशिरा मला मौत यावी
तिने कुंकवाचा टिळा लावला रे !!!"

aavadalyas jarul kalawa ........... Abhi. (9850531124)

मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा ....


Ekda bus madhe prawas karat astana hi kavita suchali... kashi vatate .. plz reply.

"मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा

मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!


का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??

आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!


एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी

मी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??


भले आजही तुला जिवंत मी दिसेनही

मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!!"

"Mitrano, ha gazal format watat asla tari hi gazal matra nahi.Hi kavita ahe yachi nond ghyawi.
(Published in 'Yuwa Sakal.' Nagpur awrutti. Mi mulcha vidarbhatil ahe na.)

तू भिजूही नको एवढी साजणी !!!



"पावसा रे किती आसवे मागतो

मी किती द्यायचे का असे वागतो .....?


मेघ पेंगायला लागले सावना

चंद्र मेघांतला का तरी जागतो ??


काळजाची व्यथा बोललो ना कुणा

थेंब होऊन ये मी तुला सांगतो !!!


पावसाच्या सरी कोसळू लागता

मी कशाला तुझ्या भोवती रांगतो ?


तू भिजूही नको एवढी साजणी

तोल माझा गडे बघ ढळू लागतो !!!"

Published in 'Yuwa SAKAL'. kashi watli te jarur sanga ...
Abhiiiii 9850531124

Saturday, July 28

"दूर पाऊस कोसळून गेला"


****
"दूर पाऊस कोसळून गेला

दवांना ललाटी तुझ्या आसरा ...!!

काळ्या विवरात विरले मेघ

सुर्य ढळता कुणाचे वेध ?

ऊर आतुन पोखरुन गेला .....

दवांना ललाटी तुझ्या आसरा !!

दूर पाऊस कोसळून गेला !!!


निळ्या अंबराला कळेना कधी

धुंद पवना कळेना ही भाषा ..

सूर शोधून सुचवून गेला !!!

दवांना ललाटी तुझ्या आसरा ...

दूर पाऊस कोसळून गेला !
!


माझ्या पावसाला विचारा तरी

कधी तो बरसेल वेड्याच्या दारी ??

चिर कोरुन ह्रिदयात गेला ..!!

दवांना ललाटी तुझ्या आसरा ...

दूर पाऊस कोसळून गेला !!!"
****

Friday, July 27

"विभोर" by Abhijit.


Mitrano, Dr. Kapil Bharate, ya tarun composer ne ya geetala atishay surekh chal lawleli ahe...
aaplya Preyasiche lagna swatachya dolya dekhat lagat astana priyakar matra hatbal zalay ... Ya theme che he geet tumhala aawdel ya apekhet ..

"तू पालखीत आता ...... अंधार या नभात .....

ही सांजवेळ माझी ....... हुंकार या उरात !


का आसवांत राणी शिवार आज माझे ?

का साहतोच आहे मी वार काळजात ??


त्या पावलांत मेंदी झंकार पैजणांचे

नि चांदरात आहे केदार अंतरात ...!!


ही वंचनाच साथी अंदाज ना कुणाला

तुझ्याविणा असा मी विभोर वादळात !!!"


Published in Rajdhul Diwali Ank 2005.